मुंबई – एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होईल अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज सायंकाळी ७.३० वाजता त्यांचा शपथविधी होईल. मी स्वत. बाहेर असेल असेही त्यांनी सांगितले. राजभवन येथे फडणवीस व शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानतंर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर झालेल्या घटनाक्रम सांगितला. त्यानंतर महाविकास आघाडी जनतेच्या बहुमताचा अपमान करून सत्तेवर आली. पण, यात शिवसेना आमदारांची झालेली अडचणही त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने केलेल्या भ्रष्टाचारावरही टीका केली. त्याचप्रमाणे तुरुंगात दोन मंत्री असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सरकार पडले तर पर्यायी सरकार देऊ असे मी आधी सांगितले होते. त्यामुळे हे सरकार आम्ही स्थापन करत असल्याचे सांगितले.
यावेळी एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले की, जे काही अडीच वर्षापूर्वी घडलं ते सर्वांना माहित आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार, महाराष्ट्राचा विकास करणार असे ते म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये काही निर्णय घेता येत नव्हते. काही मर्यादा होत्या. मतदार संघात काही अडचणी होत्या. त्यामुळे वेगळा निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतला.भाजपकडे १२० संख्याबळ आहे पण, फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला व बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद दिले असे उदाहरण दुर्मिळ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी घेतली भेट घेतली. pic.twitter.com/7cu2TxIHay
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022