मुंबई – भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. पण, हा अहवाल आता सापडला असून त्यात खडसेंना क्लीन चीट नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. या अहवालात खडसें यांच्यावर मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खडसेंच्या अडचणीत आता वाढ होणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची समिती तयार केली होती. या समितीने २०१७ मध्ये हा अहवाल सादर केला होता. पण, हा अहवाल सभागृहात मागणी करुनही सादर करण्यात आला नाही. त्यामुळे या अहवालात दडलंय काय असा प्रश्न उपस्थितीत केला जात होता. पण, आता हा अहवाल आता सापडल्यामुळे त्यावर चर्चा सुरु झाली आहे. त्यात खडसेंवर ठपका ठेवल्याचे बोलले जात आहे.
ईडीने एकनाथ खडसे यांची या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. त्याचे जावई गिरीश चौधरी यांना अटकही करण्यात आली. तर पत्नी मंदाताई खडसे यांनाही समन्स बजावले आहे. त्यामुळे भोसरी जमीन घोटाळा प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात आधीच चौकशी केलेल्या झोटिंग समितीच्या अहवालात नेमके काय आहे. याबाबत सर्वांनाच औत्सुक्य होते. त्यात आता या अहवालात क्लीन चीट नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.