इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे मुख्यमंत्रीपदासाठी जो निर्णय घेईल त्याला शिवसेनेचे पूर्ण समर्थन राहील, त्यांचा निर्णय अंतिम असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. ते म्हणाले माझ्यामुळे अडचण आहे असे मनात आणू नये असे मी काल पंतप्रधान मोदी व शाह यांना कालच फोनवरुन सांगितले. आम्ही रडणारे नाही तर लढणारे असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचे संकेत दिले.
यावेळी ते म्हणाले की आम्ही नाराज नाही. कोणत्याही पदापेक्षा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे पद महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी अडीच वर्षात जे काम केले ते मनापासून केले. योजना व विकास कामांचे सागंड घातली त्यामुळे कामे झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयामुळे लोकांची भावना मी समजू शकतो असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी महायुती काळात घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले आहे. उद्या आमची तीन्ही पक्षांची बैठक दिल्लीत आहे. त्यात चर्चा होईल त्यानंतर निर्णय होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.