इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सातारा येथील मूळ गावी दरे येथे गेलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. गेल्या तीन दिवसांपासून शिंदे हे देरगावी मुक्कामी असून काल त्यांना १०५ डिग्री ताप आला. त्यानंतर ते दिवसभर घराबाहेर पडले नाहीत. त्यानंतर डॅाक्टरांची एक टीम मुख्यमंत्र्यांना तपासण्यासाठी गेली होती. त्यानंतर आज त्यांची तब्येत काही प्रमाणात बरी आहे. आज ते ठाण्यासाठी दुपारी रवाना होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यानंतर कोणतीच विश्रांती मुख्यमंत्र्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. त्यातच हवामानातही बदल झाला आहे. त्यामुळे त्यांना अगोदर कणकण भासू लागली. त्यानंतर त्यांना ताप आला. आता त्यांची तब्येत बरी आहे.
दरम्यान काल शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे गावी गेले. पण, मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना बंगल्याच्या गेटवरुनच माघारी फिरावे लागले.