बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राणा दांपत्यावर अजितदादांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचीही समज

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 13, 2024 | 1:20 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
cm shinde sir1 e1729932401687

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमरावतीः अमरावतीमधल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. ऐन निवडणुकीत राणा दाम्पत्य आणि विरोधकांमधील वाद उफाळून आल्याने शिंदे यांनी राणा दाम्पत्याला इशारा दिला आहे. महायुतीत राहून महायुतीविरोधात काम करणाऱ्यांची नोंद घेतली जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्याअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राणा दांपत्यावर टीका केली होती.

अमरावती भाजप कार्यालयात काही दिवसांपूर्वी बडनेराचे उमेदवार रवी राणा यांची बैठक झाली. त्यामध्ये रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा कमी झाली, तरी चालेल पण कमळ निवडून आले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. राणा यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांकडून त्यांची कानउघडणी करण्यात आली. ‘राणा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धीसारखे वागत आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेले बरे. त्यांच्या अशा बोलण्यानेच लोकसभेला त्यांच्या पत्नीचा पराभव झाला, असे पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आता शिंदे यांनीही राणा दाम्पत्याचे कान टोचले आहेत.

“महायुती मजबुतीने लढत आहे. महायुतीत कोणीही मीठाचा खडा टाकण्याचे काम करू नका. मी राणा परिवारालाही सांगतो, की तुम्ही महायुतीचे घटक आहात. महायुतीत सरकार तुमच्या पाठीशी उभे राहिले आहे. सरकार आणण्यासाठी कॅ. अभिजीत अडसूळदेखील आपल्याला हवे आहेत. म्हणून आपणदेखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. महायुतीत राहायचे आणि महायुतीच्या विरोधात काम करायचे हे कोणी करता कामा नये. मुख्यमंत्री म्हणून मी हे आवाहन करत आहे,” असे शिंदे यांनी म्हटले.

“दर्यापूर मतदार संघाचे उमेदवार अडसूळ यांच्यामध्ये काम करण्याची तळमळ आहे. न थकता काम करणाऱ्या अभिजीतला या ठिकाणी विजयी करायचे आहे. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. अमरावती जिल्ह्यात संत्रा इस्टेट उभारत आहे. वैनगंगा नळगंगा प्रकल्प या दोन प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली आहे. कॅप्टन अभिजीत विधानसभेत पोहोचल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहे. यामुळे विरोधकांची पायाखालची वाळू घसरलेली आहे. या लाडक्या बहिणीच महायुतीचे सरकार पुन्हा आणणार आहेत; मात्र सावत्र व दुष्ट भावांपासून सावध राहा,” असे आवाहन त्यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खर्गे आणि योगी आदित्यनाथ यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध…

Next Post

गडकरी यांची काँग्रेसवर टीका; संविधान बदलण्याचे पाप त्यांचेच

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला रवाना…ठिकठिकाणी स्वागत,पत्नी व मुलीला अश्रू अनावर

ऑगस्ट 27, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

या महाविद्यालयातील २१ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…महाराष्ट्रातील २ शिक्षकांचा समावेश

ऑगस्ट 27, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा

ऑगस्ट 27, 2025
1 6 1068x1335 1 e1756283788606
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धा….प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

ऑगस्ट 27, 2025
court 1
संमिश्र वार्ता

गोदावरी नदीच्या पुनर्जीवन याचिकेत अवमान याचिका…दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

ऑगस्ट 27, 2025
Untitled 45
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उध्दव ठाकरे…सहकुटुंब घेतले गणपतीचे दर्शन

ऑगस्ट 27, 2025
भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Next Post
WhatsApp Image 2024 11 10 at 21.13.19 2 scaled e1731441171296

गडकरी यांची काँग्रेसवर टीका; संविधान बदलण्याचे पाप त्यांचेच

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011