मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून मनसेने उमेदवारी न देण्याचा निर्णय़ घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून या मतदार संघात मनसे कोण उमेदवार देणार याची उत्सुकता असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारी न देण्याचा निर्णय़ घेतला.
या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून मनसेने अभिजीत पानसे यांचे नाव निश्चित झाले होते. पण, अखेरच्य क्षणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत असलेल्या मैत्रीतून तिथे उमेदवार न देण्याचा निर्णय़ घेतला. राज ठाकरे हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत अशा शब्दात मनसेच्या काही नेत्यांनी त्यांच्या या निर्णयांचे कौतुक केले आहे.
आता मुख्यंत्री एकनाथ शिंदे हे माहिम विधानसभा मतदार संघातून आपले उमेदवार विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना माघार घेण्यास सांगणार का याची उत्सुकता आहे. या मतदार संघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उमेदवार आहेत.