मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथील कोपरी पचपाखाडी विधान सभा क्षेत्रात उमेदवारी करणार आहे. याच मतदार संघात ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघेना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
या विधानसभा मतदार संघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण लढत होणार आहे. या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात मनसे कोणाला उमेदवारी देतात ही अद्याप निश्चित नाही. ठाणे शहरातून ठाकरे गटाकडून माजी खासदार राजन विचारे हे उमेदवार असणार आहे. लोकसभेत पराभव झाल्याने ठाकरेंकडून विचारे यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न विधानसभेत केला जाणार आहे.
तर ओवळा माजिवाडा विधान सभा क्षेत्रात शिवसेनेचे प्रताप सरनाईक विरुद्ध ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मनेरा लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाची यादी अद्याप समोर आली नसली तरी बहुतांश उमेदवारांना मात्र एबी फार्म देण्यात आले आहे.