इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणा-या पाचही टोल नाक्यावर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्ण घेण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विधानसभा निवणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आज झाली. त्यात हा मोठा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे आता वाशी, मुलुंड, पूर्व – पश्चिम, एेरोली, दहीसर या टोलनाक्यावर आता टोलमाफी असणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने गेल्या काही दिवसात निर्णय़ घेण्याचा धडाका लावला आहे. त्यात आज हा मोठा निर्णय घेतला आहे.