इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी स्नेहभोजन करत त्यांनी त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. माहीम विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात दूरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यामुळे ही भेट चांगलीच चर्चेत आली. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असल्याचे बोलले जात आहे. या भेटीनंतर राजकीय चर्चला उधान आले आहे.
या भेटीनंतर शिंदे यांनी सांगितले की, ही एक सदिच्छा भेट होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आम्ही एकत्र काम करत होतो. काही कारणांमुळे आम्ही काही काळ भेटलो नाही. त्याचे कारण तुम्हाला माहिती आहे, पण आता आम्ही कधीही भेटू शकतो आणि बोलू शकतो. ते मलाही भेटतात… प्रत्येक भेटीतून राजकीय अर्थ काढणे योग्य नाही.
या भेटीत बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींवर चर्चा झाली. मुंबईतील सिमेंटच्या रसत्यांची मी पाहणी केली. त्यावर राज ठाकरेंशी चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा न होता विकासकामांवर चर्चा झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
राज्याचे मंत्री उद्य सामंत यांनी या भेटीबाबत सांगितले की, एकनाथ शिंदे जर राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले तर त्याचे नक्कीच अर्थ निघतील. पण, राज ठाकरे जर आमच्यासोबत आले तर नक्कीच आम्हाला आनंद होईल, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे संबध हे फार जुने आहेत.