इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत मोठा गौप्यस्फोट करत उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, भाजपवर नेहमी आरोप करणा-या उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले होते.
आज विधानसभेत हा आरोप करतांना ते म्हणाले की, तपास यंत्रणाच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींसमोर लोटांगण घातले. दिल्लीत जाऊन मला वाचवा, राज्यात युती सरकार स्थापन करु असे सांगून आलेल्या ठाकरे यांनी राज्यात आल्यावर पलटी मारली असेही शिंदे म्हणाले.
यावेळी त्यांनी उबाठा शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सोडले आणि औरंगजेबी विचार स्विकारले आणि काँग्रेसबरोबर गेले. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवले त्यांच्याबरोबर तुम्ही सत्तेसाठी गेलात अशी टीकाही त्यांनी केली.