नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -विधानसभा निवडणुकीत महायुतीला दिलेल्या भरघोस यशाबद्दल नाशिककरांचे आभार मानण्यासाठी शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार१३ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे येणार आहे. यावेळी सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नागरिकांसह उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय (अप्पा) करंजकर यांनी सिडको आणि सातपूर येथे झालेल्या नियोजन बैठकीत केले.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे नियोजन बैठका घेण्यात येत आहेत. शनिवारी सिडकोतील मोरवाडी येथील उत्कर्ष सभागृह आणि सातपूर येथील अयोध्या हॉटेलमध्ये नियोजन बैठक पार पडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आणि ९ फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस असल्याने शिवसैनिकांनी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय (अप्पा) करंजकर यांनी यावेळी केले. शिवसेना पंधरवडा निमित्त शिवसैनिकांनी प्रत्येक प्रभागात जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केले.
यावेळी, महिला आघाडी जिल्हा समन्वयक श्यामलाताई दीक्षित, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुवर्णाताई मटाले, युवतीसेना जिल्हाप्रमुख हर्षदाताई गायकर यांनीही उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांना नियोजनाबाबत मार्गदर्शन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौरा यशस्वी करण्याचे आवाहन केले. या बैठकांना सहसंपर्क प्रमुख राजु (अण्णा) लवटे, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, उपजिल्हाप्रमुख शंकर पांगरे, महिला आघाडी महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, माजी नगरसेवक मधुकर जाधव, भागवत आरोटे, विक्रम नागरे, अमोल जाधव, सतीश खैरनार, बाजीराव दातीर, माजी नगरसेविका इंदूबाई नागरे, मंदाकीनी जाधव, मंदाकिनी दातीर, महिला आघाडी उपमहानगरप्रमुख ज्योतीताई फड, विधानसभा प्रमुख सुलोचनाताई मोहिते, मध्यवर्ती कार्यालय प्रमुख शरद नामपूरकर, शिक्षक कर्मचारीसेना जिल्हासंघटक मनेश खेले, विद्यार्थी सेना महानगरप्रमुख शुभम पाटील, विधानसभा प्रमुख दिपक मौले, जिवन दिघोळे, पुजा तेलंग, ऍड. श्रद्धा जोशी, रोहिणी देवरे, अनिता उगले, बबलू सूर्यवंशी, प्रकाश पवार, आकाश पवार, उपमहानगरप्रमुख अरुण घुगे, कैलास जाधव, विभागप्रमुख शरद चिखले, विकी जाधव, दिपक नागरे, अमित मांडगे, राजेंद्र मोहिते, अविनाश पांगरे, नितीन अमृतकर, सागर बोरसे, दत्तात्रय पाटील, राहुल भुजबळ, रामदास धात्रक, राजेंद्र रणमाळे, संजय गायकवाड, अनिल काळे, रोहित घुले, ईशाख शेख, धवल डरांगे, दुर्गेश चौधरी, ज्ञानेश्वर ढगे, आदित्य माळी, योगेश जाधव, दिपक कडाळे, महेश सोनवणे शिवसेनेचे सर्व शाखाप्रमुख, महिला आघाडी व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.