इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केल्यानंतर गुरुवारी कुलाबा येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
गेली अडीच वर्षे त्यांच्या विचारांवर चालणारे सरकार यशस्वीपणे चालवल्यानंतर आता यापुढेही त्यांना अभिप्रेत असलेलेच काम मी, माझे सहकारी आणि माझे तमाम शिवसैनिक करतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी शिवसेनेतील आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेचे पक्ष कार्यालयात सत्कार
राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केल्यावर शिवसेनेचे पक्ष कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवन येथे एकनाथ शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार डॉ.नीलमताई गोऱ्हे, भरतशेठ गोगावले, शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, दादाजी भुसे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, किरण सामंत, योगेश कदम, आशिष जयस्वाल, बालाजी कल्याणकर आणि प्रभाकर काळे उपस्थित होते.