मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले आहे. सातारा येथील दरेगाववरुन दोन दिवासात ते ठाणे येथील निवासस्थानी आले. त्यानंतर त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाली नाही.
आता ज्युपिटर हॅास्पिटलमधील तज्ञ डॅाक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या डेंग्यूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा असल्याची डॅाक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे.
५ डिसेंबरला महायुतीचा शपथविधी सोहळा असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती बरी नाही. त्यामुळे ते शपथविधी सोहळ्याला हजर राहणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.