इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा हा ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या शपथविधी सोहळ्या अगोदर एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी अडून बसले आहे. गृहखाते न दिल्यास ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपने त्यांना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर देऊन डॅा. श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली. पण, केंद्रात न जाण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला असून राज्यात सन्मानाचे पद मिळावे यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार घडामोडी सुरु आहे. गुरुवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली. कोणत्या पक्षाला कोणत्या खात्याचं मंत्रिपद द्यावं, ते ठरवण्यात आले आहे. त्यानंतर आज मुंबईत बैठक होती. पण, आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे गृहखाते मिळावे यासाठी आग्रही आहे.