इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावमध्ये भाजप आमदारांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदत घेत सीडीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी त्यांनी ही सीडी मला प्रफुल्ल लोढा हेच देणार होते असे सांगितले. ईडी लावली तर सीडी लावेल असे मी म्हणत होतो. त्यावेळी मला ही सीडी लोढा यांनी दिली नाही. त्यामुळे नाथाभाऊ बदनाम झाले.
यावेळी खडसे यांनी गिरीश महाजन यांना तीन चँलेज दिले. प्रफुल्ल लोढा यांची नार्कोटेस्ट करावी, महाजनांची संपत्तीची चौकशी व्हावी व माझ्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करावी असेही ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, महाजनांकडून मला अडकवण्याचे काम केले, ईडी सारख्या प्रकरणातून बाहेर आलो, माझ्या जावयाला यांनी अडकून जेलमध्ये टाकलं असे आरोपही त्यांनी केले.
यावेळी त्यांनी सरकारमध्ये अजीत पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ईडी साऱखे अनेक आरोप असतानाही ते कसे आता पवित्र झाले असा सवालही केला.