जळगाव ( इंडिया दर्पण वृत्तसेवा )– एकनाथ खडसे म्हणजे राज्यातले दुसरे संजय राऊत असल्याचे सांगत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना कुठलीही क्लिनचिट कोर्टाने दिलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळे ते म्हणाले की, झोटिंग समितीचा अहवाल सुद्धा सर्वांसमोर आहे. ते म्हणत असेल तर हा अहवाल विधानसभेत पटलावर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांना सांगेन, असे आव्हानही त्यांनी खडसे यांना दिले. यावेळी त्यांनी त्यांचे जावई वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. रजिस्ट्रार सुध्दा जेलमध्ये आहे. आता फक्त कोर्टाची नो करेक्टीव्ह अॅक्शन असल्यामुळे खडसे जेलमध्ये जात नाही. कोर्टाची ॲक्शन हटल्यावर जावयासोबत एकनाथ खडसे सुध्दा जेलमध्ये जातील असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
एकनाथ खडसे यांच्या विरोधात सत्तेचा गैरवापर केलेला नाही. तुम्ही पाक असाल तर चौकशी समितीला सामोर जावून पुरावे दाखवा, पुरावे नसतील तर कारवाई होईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी खडसे यांच्या विरोधातील तक्रारी या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या आहेत. मात्र गेल्या काळात त्यांचे सरकार असल्याने या तक्रारी दाबल्या गेल्या होत्या. आता चौकशीत त्यात स्पष्टता येईल आणि कोण स्वच्छ आहे, कोणाचे हात बरबटले आहेत, ते सुध्दा समोर येईल, असे महाजन यांनी सांगितले.