इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी रोहिणी खडसे यांचे पती प्राजंल खेवलकर यांच्या अडचणी वाढल्या आहे. गुरुवारी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सापडल्याची माहिती दिली. खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ, १४९७ नग्न फोटो असल्याचेही त्यांनी सांगितले. मुलींना विवस्त्र करुन नशेत त्यांचे घाणेरडे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. तसेच साफसफाई करणा-या मोलकरणीचे फोटो व्हिडिओ आहेत. या मुलींना पटवण्यासाठी आरुष नावाचा माणून ठेवला होता. चित्रपटात काम देऊन त्या मुलींना बोलावलं जात होतं. यात मानवी तस्करी झाली आहे. त्यामुळे आता एसआयटी स्थापन करण्यासंदर्भात पत्र दिल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, खेवलकर दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्या एखाद्या पोलिस अधिका-याप्रमाणे बोलत आहेत. विशेष म्हणजे त्या जी माहिती सांगत आहेत. वास्तविक पाहता ती पोलिसांनी सांगायला पाहिजे. रोहिणी खडसे आणि त्यांचे मैत्रीचे संबध कसे आहेत हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे चाकणकर या चेकाळून बोलत आहेत. एखादी खासगी माहिती ते अशाप्रकारे कशी सार्वजनिक करु शकतात. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी करणे योग्य आहे.
आपण आपल्या जावयाची बाजू घेणार नाही. दोषी असेल तर त्याला फाशी द्यायला हवी, हा मात्र बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. एकाही मुलीची त्याच्या विरोधात तक्रार नाही, खासगी आयुष्य आहे. एसआयटी पेक्षा केंद्राच्या एखाद्या तपास यंत्रणाव्दारे तपास केला जावा. सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास करावा असेही खडसेंनी सांगितले. त्यांनी रुपाली चाकणकर यांचे बोलणे राजकीय व्देषातून असल्याचेही ते म्हणाले.
ते हॅाटेल २८ वेळा बुक
खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. प्रज्ञा खोसले यांच्या सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली. या तक्रारीत खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॅाटेल २८ वेळा बुक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या हॅाटेलमध्ये अनेकवेळा मुलींना बोलावण्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर राज्य महिला आयोगाने पोलिस आयुक्त, पुणे यांना सदर प्रकरणाची मानवी तस्करी. विरोधी पथक, सायबर विभाग यांचे मार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर हा अहवाल आला. याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.