नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच गोमातेला पुष्पहार घालून पूजन केले. महाराष्ट्र शासनाने गोमातेला ‘राज्यमाता-गोमाता’ नुकतीच म्हणून मान्यता दिली आहे.
या पूजन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी गाय या गोमातेचे पूजन केले. लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील परसराम सापनर यांची लाल कंधारी, किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथील संतोष पेळे यांची मथुरा लभाण व नांदेड येथील श्रीरंग डोईफोडे यांच्या देवणी गायीचा समावेश आहे.
यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आदी उपस्थित होते.