जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार यावे असे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महायुतीवर सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, राज्यात गेल्या काही महिन्यापासून महायुती सराकारचा अनुभव चांगला वाटन नाही, राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. सूडबुध्दीने ईडी, सीबीआय कारवाई करत आहेत. जनतेची कामे होतांना दिसत नाही असे सांगत निशाणा साधला.
यावेळीत्यांनी लाडकी बहीन योजनेवरुनही सराकारचे कान टोचले. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ४६ हजार कोटी रुपये दिले. ते ४६ हजार कोटी रुपये धरणे, रस्ते निर्मितीसाठी द्यावेत यातून स्थायी मालमत्ता निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे मला महायुतीचे सरकार जावे आणि पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार यावे असे वाटते.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून बाहेर पडत त्यांनी भाजपमध्ये गेल्याची घोषणा केली होती. पण, त्यांचा अद्याप अधिकृत प्रवेश झाला नाही. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा महाविकास आघाडीची बाजू घेतल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चेचा उधाण आले आहे.
……..