नाशिक – तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली वीर-झनकर यांना शुक्रवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.उद्या परत त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडल्यानंतर त्या दोन दिवसापासून फरार होत्या. पण, आज पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी वैशाली वीर यांच्यासह दोन जणांवर लाच प्रकरणी कारवाई केली होती. पण, महिला असल्याने सुर्यास्तानंतर अटक करता येत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समन्स बजावत वैशाली वीर यांना दिराच्या ताब्यात दिले होते. बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण त्या हजर राहिल्या नाही. त्यानंतर न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या फरार झाल्याचे न्यायालयात सांगितले. पण, या प्रकरणातील वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते या दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालाने या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर आता वीर यांना अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केल्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
असे अडकले सापळ्यात
नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली पंकज वीर- झनकर यांच्यासह तीन जण ८ लखाची लाच घेतांना मंगळवारी सापळ्यात अडकले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या पथकाला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार्य केले. या प्रकरणात तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता लाच प्रकरणातील आरोपी पंकज रमेश दशपुते (राजेवाडी येथील प्राथमिक शिक्षक) यांनी आरोपी वैशाली वीर- झनकर यांचे करिता नऊ लाख रुपयाची मागणी केली. त्यांनंतर दिनांक २७ जुलै २०२१ रोजी वीर यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती आठ लाख स्वीकारल्याचे मान्य करून लाचेचा पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले. सोबत करण्या बाबत सांगितले. त्यांनंतर १० ऑगस्ट रोजी येवले यांनी वीर यांचे करीत तक्रारदार यांचे कडून ८ लाख रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.