परिविक्षाधीन सहायक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील परिविक्षाधीन सहायक शिक्षक (शिक्षण सेवक) व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून याबाबत राज्य शासनामार्फत उच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी व परिविक्षाधीन सहायक शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न डॉ.सुधीर तांबे यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांनी ही माहिती दिली.
जुन्या पेन्शन योजनेबाबत न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल असल्याने याबाबत न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी याबाबत माहिती दिली. या चर्चेत सदस्य सर्वश्री नरेंद्र दराडे, डॉ.सुधीर तांबे, डॉ. रणजित पाटील यांनी सहभाग घेतला.
Education Minister on Old Pension Scheme and honorarium Hike
Vidhan Parishad Deepak Kesarkar Monsoon Assembly Session