नाशिक – कोरोनाच्या काळातही खासगी शाळांकडून शैक्षणिक शुल्क वाढ केली जात असल्याच्या वारंवार तक्रारी पालकांकडून येत आहेत. यासंदर्भात ग्राहक पंचायतीने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेतली. त्याची तत्काळ दखल घेत उपासनी यांनी तत्काळ आदेश काढले आहेत. शाळांच्या या प्रश्नाबाबत राज्य सरकारच्या निर्देशानुसार नाशिक विभागासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या येत्या १५ दिवसात बैठक घेण्याचे निर्देश उपासनी यांनी दिले आहेत.
सविस्तर आदेश असे