नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खाद्य तेलाच्या दरात घसरण झाली असली तरी दुकानदारांकडून चढ्या दराने तेल विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फटका दिसत आहे. तेलाचे दर किलोमागे वास्तविक ३० ते ४० रुपयांनी कमी होणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही झालेले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
दिल्लीच्या तेलबिया बाजारात मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन तेल-तेलबिया, सीपीओ, कापूस बियाणे, पामोलिन खाद्यतेलाच्या घाऊक भावात घसरण झाली. शासनाच्या प्रयत्नांमुळे खाद्यतेलाचे दर सातत्याने घसरत असले तरी किरकोळ बाजारात मात्र दुकानदार ३० ते ४० रुपयांनी महाग विकत आहेत.
खाद्यतेलाच्या घाऊक दरात ज्याप्रकारे घसरण झाली आहे, त्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांनाही मिळायला हवा, मात्र एमआरपीच्या बहाण्याने त्यांची मनमानी पद्धतीने लूट केली जात असल्याचे बाजारातील सूत्रांचे म्हणणे आहे. हे दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. एमआरपीच्या नावाखाली मोहरीचे तेल सध्याच्या किमतीनुसार १५४ ते १६० रुपये प्रतिलिटर या दराने उपलब्ध असले तरी ग्राहकांना ते १९० रुपये लिटरने विकले जात आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांकडून शेंगदाण्यावर प्रतिकिलो ७० रुपये, सूर्यफुलावर ४० रुपये आणि इतर खाद्यतेलावर ३० ते ४० रुपये अधिक आकारले जात आहेत.
काही महिन्यांपूर्वीच तेल उद्योगातील बड्या उद्योजकांच्या सरकारसोबत झालेल्या बैठकीत खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत (MRP) जास्त ठेवण्याबाबत चर्चा झाली होती, पण तरीही एमआरपीबाबत अनियमिततेच्या तक्रारी येत आहेत आणि सरकारने ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही करण्यात येत आहे. मूळ किंमतीपेक्षा जास्त किंमतीने खाद्यतेल विकणाऱ्या दुकानांवर छापे टाकावे व खाद्यतेलाच्या एमआरपी पडताळून बघाव्या अशी मागणीही करण्यात येत आहे. अन्यथा शुल्क कमी करण्यासारख्या शासनाच्या उपक्रमाचा काहीही उपयोग होणार नाही.
दिल्लीच्या बाजारपेठेतील तेल आणि तेलबियांचे भाव असे
मोहरी तेलबिया – ७३१५ – ७३६५ रुपये (४२ टक्के स्थिती दर) प्रति क्विंटल.
भुईमूग – रु. ६६६० – रु. ६७९५ प्रति क्विंटल.
भुईमूग तेल मिल वितरण (गुजरात) – रु १५८५० प्रति क्विंटल.
भुईमूग सॉल्व्हेंट रिफाइंड तेल रु. २६५० – २८४० प्रति टिन.
मोहरीचे तेल दादरी – १४७०० रुपये प्रति क्विंटल.
तीळ तेल मिल वितरण – रु. १७००० – १८५०० प्रति क्विंटल.
सोयाबीन ऑइल मिल डिलिव्हरी दिल्ली – रुपये १६२५० प्रति क्विंटल.
सोयाबीन मिल डिलिव्हरी इंदूर – रु १५६०० प्रति क्विंटल.
सोयाबीन तेल डेगम, कांडला – रु. १४,७०० प्रति क्विंटल.
सीपीओ एक्स – कांडला – रु १४४०० प्रति क्विंटल.
कापूस बियाणे मिल वितरण (हरियाणा) – रु. १४८०० प्रति क्विंटल.
पामोलिन आरबीडी, दिल्ली – रु १५९०० प्रति क्विंटल.
पामोलिन एक्स-कांडला- रु १४७५०(जीएसटी शिवाय) प्रति क्विंटल.
सोयाबीन धान्य – ६१०० – ६८०० रुपये प्रति क्विंटल.
सोयाबीनला प्रति क्विंटल ६,४००-६,५०० रु.
मका – प्रति क्विंटल ४००० रु.