मुंबई – दिवाळीच्या सणात नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची दुसरी गुडन्यूज आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले आहेत. त्यामुळे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, आता गोडतेलाचे दरही घटणार आहेत. सणासुदीच्या काळात तेलाचे दर चढे असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी काहीशी कडूच आहे. मात्र, आता दिवाळीच्या सणात केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सातत्याने महागाई वाढत आहे. तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने घराघरातील किचनचे बजेट कोमडले आहे. अशातच आता महत्त्वाचे वृत्त समोर आले आहे. केंद्र सरकारने तेलाच्या आयात शुल्कामध्ये कपात केली आहे. परिणामी गोडतेलाचे दर किलोमागे ५ ते ८ रुपयांनी कमी झाले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आता सर्वसामान्यांना कमी दरात तेल मिळू शकणार आहे. तसेच, येत्या काळात तेलाचे दर आणखी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.