मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात ही नोटीस आहे. या नोटीस बाबतची माहिती शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी दिली आहे. ही नोटीस दिल्यानंतर त्यांनी ट्विट केले आहे. त्यात राऊत यांनी सांगितले की, शाब्बास !…जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र
https://twitter.com/rautsanjay61/status/1431955511079886850?s=20