मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त सचिन बाळासाहेब सावंत यांना अटक केली. होती, विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना ईडी कोठडी सुनावली, सुमारे ५०० कोटींच्या अफरातफर प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप ठेवत सचिन सावंत यांना जून महिन्यात अटक करण्यात आली होती. यानंतर सावंत बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचेही उघडकीस आले. यानंतर ईडी आणि सीबीआय दोन्ही संस्थांनी सावंत यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला. त्यानंतर आता सचिन सावंत याने अग्रगण्य मल्याळी अभिनेत्री नव्या नायर हिला विविध प्रकारचे दागिने आणि अनेक महागडी गिफ्ट दिल्याची माहिती ईडीच्या तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी नव्या नायरची दोनच दिवसांपूर्वी ईडीने मुंबईत चौकशी केली होती.
आरोपपत्र दाखल
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्यावर अखेर मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी ईडीने एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचाही जबाब नोंदवला आहे. सचिन सावंत आणि या अभिनेत्रीमध्ये झालेल्या पैशांच्या व्यवहारातून तिची चौकशी करण्यात आली. ईडीने संबंधित व्यवहाराच्या प्रकरणात अभिनेत्रीला समन्स जारी करुन बोलावले होते. सचिन सावंत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली आहे. सचिन सावंत यांच्या विरोधात सीबीआयने बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल दाखल केला होता. त्या प्रकरणी मनी लॉड्रिंगच्या अनुषंगाने ईडी तपास करत होती. तेव्हा सचिन सावंत याची चौकशी करताना ईडीच्या अधिकाऱ्यांना सावंत आणि नव्या यांच्यात झालेले चॅट्स आढळले. सावंतने नव्या नायर हिला अनेक गिफ्ट व दागिने दिल्याची माहितीही तपासात अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
महागडे गिफ्टस दिले
सचिन सावंत लखनौ जीएसटी विभागात कार्यरत होते. याआधी सावंत ईडीमध्ये उपसंचालक पदावर कार्यरत होते. केवळ नव्या नायर या अभिनेत्रीलाच नव्हे तर तिच्या मुलालाही वाढदिवशी सावंत याने भेटवस्तू दिल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. मात्र, सावंत आणि आपली मैत्री असून, केवळ मित्र म्हणून आपण त्याच्या कडून भेटवस्तू स्वीकारल्याचे नव्या हिने तपास अधिकाऱ्याने सांगितले. परंतु तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाहीत. सावंत याने नव्याला दिलेल्या भेटवस्तू या सावंत याने गैरमार्गाने मिळविलेल्या पैशांतून दिल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय असून, त्याच अनुषंगाने अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली होती. दरम्यान, सावंत याच्या वडिलांच्या नावे एक बेनामी कंपनी असल्याचीही माहिती तपासात उघड झाली आहे. तसेच आणखी काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.
ED Money Laundering Enquiry Famous Actress