इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने शुक्रवारी नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक” (NAMCO), मालेगावच्या प्रकरणात अहमदाबाद आणि मुंबई येथील ७परिसरांमध्ये शोध मोहीम राबवली. शोध मोहिमे दरम्यान १३.५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगाव वोट जिहाद घोटाळा आता १००० कोटींचा झाल्याचा आरोप केला होता. त्यात आयकर, ED, पोलीस, बँकिंग विभाग तपास करीत आहेत.सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मदचा मालेगाव येथील बेनामी खात्यात देशविदेशातून कोट्यवधी रुपये आले. ८०० कोटी हवालाने सुरत अहमदाबाद मुंबई वळवण्यात आले, हा पैसा वोट जिहादसाठी वापरण्यात आला असे सांगितले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.
https://twitter.com/dir_ed/status/1865076455245566430