इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ईडीने आज कर्नाटकचे चित्रदुर्ग मतदारसंघातील आमदार केसी वीरेंद्र यांना बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजी प्रकरणात गंगटोक येथून अटक केली आणि त्यांच्याकडून सुमारे १२ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
या कारवाईत ईडीने अंदाजे एक कोटी परकीय चलन, ६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, सुमारे १० किलो चांदीच्या वस्तू आणि पीएमएलए, २००२ अंतर्गत चार वाहने समाविष्ट आहे.
केसी वीरेंद्र काँग्रेसचे आमदार असून ते गोव्यातील कॅसिनो व्यवसायात भागीदार असल्याचे बोलले जाते. प्रसिध्द पपीज कॅसिनोसह सुमारे पाच कॅसिनो त्यांचे आहेत. दुसरीकडे ८ दिवसांपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसच्या एका आमदाराच्या घरी १.४१ कोटी रुपये सापडले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असून त्यामुळे केंद्र सरकारच्या इसा-यावरुन ईडी कारवाई करत असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या आमदारांना लक्ष केले जात असून सत्ता खिळखिळी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.