नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रोटरी क्लब ऑफ नाशिक रिव्हरसाइड आणि रोटरी व्हिजन नेक्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इको ब्रिक प्रकल्प सत्र मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी मॉडर्न हायस्कूल, सातपूर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. या सत्रात ८ वी आणि ९ वीच्या एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सतत वाढणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम आणि “इको ब्रिक” तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यावर उपाय याविषयी rotary vision next माजी अध्यक्ष रोटरिअन ऋषिकेश मऱ्हाळकर आणि रोटरिअन उमेश बोरसे यांनी सोप्या आणि प्रभावी भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
इको ब्रिक प्रकल्पाचे वैशिष्ट्ये:
आजच्या काळात प्लास्टिकचा वापर अटळ आहे, परंतु त्याच्या योग्य विल्हेवाटीची जबाबदारी आपली सर्वांची आहे. पालिका पातळीवरील स्वच्छता मोहिमा असूनही प्लास्टिक कचरा उघड्यावर टाकला जातो आणि पर्यावरणास गंभीर धोका निर्माण करतो.
“इको ब्रिक” हा या समस्येवरील सोपा, किफायतशीर आणि प्रभावी उपाय आहे. कोणताही आर्थिक खर्च न करता प्रत्येकजण हा उपक्रम सहज राबवू शकतो. यामध्ये रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये प्लास्टिकच्या आवरणांचा भराव करून उपयोगी ब्रिक्स तयार केल्या जातात. या इको ब्रिक्स चा वापर झाडांचे संरक्षक कठडे (Tree Guards), पादचारी मार्ग (Pavements), आणि फर्निचर तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय, आश्रमशाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना या वस्तू भेट देऊन सामाजिक उत्तरदायित्वही पार पाडता येते.
रोटरी एनक्लेव्ह सचिव रोटरिअन मोहन भावे, रोटरी रिव्हरसाइड अध्यक्ष रोटरिअन नीता लेले, आणि सचिव रोटरिअन जयश्री बापट यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हे सत्र प्रभावीपणे राबवण्यात आले. • रोटरी चार्टर प्रेसिडेंट रोटरिअन पारूत गुरेड्डी, रोटरिअन आरती कुलकर्णी , मॉडर्न हायस्कूलचे हेडमास्तर माळी सर, शिक्षिका श्वेता लोंढे आणि संपूर्ण शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमाची माहिती आपल्या पालक, मित्र आणि समाजातील इतरांना द्यावी, तसेच अधिकाधिक लोकांनी “इको ब्रिक” प्रकल्पात सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले. Rotary सप्ताहाच्या निमित्ताने eco brick माध्यमातून रोटरी वासुंधरेच मदर earth संरक्षण व संवर्धनासाठी आपली कटिबध्दता कायम ठेवत आहे