शनिवार, जुलै 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

by Gautam Sancheti
जुलै 26, 2025 | 12:58 pm
in संमिश्र वार्ता
0
ECI response 1024x768 1 e1741738630767

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. या निवडणुकीसाठी “राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम, १९५२” आणि त्याखालील “नियम, १९७४” लागू होतात.

या अधिनियमाच्या कलम ३ नुसार, निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करतो, ज्यांचे कार्यालय नवी दिल्ली येथे असते. याशिवाय, एक किंवा अधिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीही नियुक्त केले जाऊ शकतात. परंपरेनुसार, लोकसभा किंवा राज्यसभा सचिवालयाचे महासचिव हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आलटून पालटून नियुक्त केले जातात. मागील उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी लोकसभा सचिवालयाचे महासचिव निवडणूक निर्णय अधिकारी होते.

त्याअनुषंगाने, आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्यसभा सचिवालयाचे महासचिव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कायदा व न्याय मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार आणि राज्यसभेचे उपसभापती यांची संमती घेऊन करण्यात आली आहे.

याशिवाय, श्रीमती गरिमा जैन, संयुक्त सचिव (राज्यसभा सचिवालय) आणि श्री विजय कुमार, संचालक (राज्यसभा सचिवालय) यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राजपत्र अधिसूचना स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ईडी अधिकाऱ्याला लाचखोरी प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा….

Next Post

नाशिक जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद परीक्षण केंद्रांची होणार उभारणी…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Maha Gov logo 07 1 1024x512 1

नाशिक जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद परीक्षण केंद्रांची होणार उभारणी…

ताज्या बातम्या

mukt

मुक्त विद्यापीठात बीएड प्रवेश प्रक्रिया सुरू…ही आहे अंतिम मुदत

जुलै 26, 2025
Untitled 51

क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो या तारखेला…५०० हून अधिक विविध पर्याय एकाच छताखाली

जुलै 26, 2025
khadse

त्या सीडीबाबत एकनाथ खडसे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

जुलै 26, 2025
accident 11

अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार जखमी…वेगवेगळया भागात झालेल्या घटना

जुलै 26, 2025
IMG 20250726 WA0385 1

चांदवड तालुक्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटात प्रवेश

जुलै 26, 2025
IMG 20250726 WA0376

वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा…उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

जुलै 26, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011