शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारत निवडणूक आयोगातर्फे १ लाखांहून या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण सुरू…हे आहे कारण

by India Darpan
मार्च 27, 2025 | 2:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
ECI response 1024x768 1 e1741738630767

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी नवी दिल्ली येथील भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था (IIIDEM) येथे प्रथमच होणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे राज्य सरकारी कर्मचारी असतात, ज्यांची नियुक्ती मतदार नोंदणी अधिकारी (ERO) द्वारे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या (DEO) मंजुरीनंतर केली जाते. मतदार यादी त्रुटीविरहित ठेवण्यात मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्य सरकारांनी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून SDM स्तरावरील किंवा समकक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या अधिकाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यावर विचार करावा, असे सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 326 आणि लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम २० नुसार, १८ वर्षे पूर्ण झालेले आणि संबंधित मतदान केंद्राच्या क्षेत्राचे सामान्य रहिवासी असतील असे भारतीय नागरिक हे मतदार होऊ शकतात.

तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील मतदारयाद्यांचे अद्यतन करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत.

याशिवाय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विरोधात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना सौजन्यशील आणि सभ्य वर्तन ठेवण्यास सांगितले.

येत्या काही वर्षांत अशा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे दर १० मतदान केंद्रांसाठी एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या प्रमाणात एकूण १ लाखाहून अधिक मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना प्रशिक्षित केले जाईल. हे प्रशिक्षित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी १०० कोटी मतदार आणि आयोग यांच्यातील प्रथम व सर्वांत महत्त्वाचा दुवा आहेत. विधानसभा मतदारसंघस्तरावरील मास्टर प्रशिक्षक (ALMT) यांचा गट तयार करून ते देशभरातील मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांचे नेटवर्क मजबूत करतील.

हा क्षमता बांधणीचा प्रशिक्षण कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरु राहील. प्रथम टप्प्यात निवडणूक होणाऱ्या राज्यांवर भर दिला जाईल. सध्या बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम येथील 109 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू येथील 24 मतदार नोंदणी अधिकारी आणि 13 जिल्हा निवडणूक अधिकारी हे या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५०, मतदार नोंदणी नियम १९६० आणि भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगणे आणि मतदार यादी त्रुटीविरहित ठेवण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणे हा आहे. तसेच, या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना त्यांच्या कार्यासाठी उपयुक्त आयटी प्रणालींची माहिती दिली जाईल.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, भारतीय निवडणूक आयोग नेहमीच भारताच्या १०० कोटी मतदारांसोबत राहील, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिले हे उत्तर

Next Post

अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे १२ महत्त्वाचे कायदे मंजूर…पुढील अधिवेशन ३० जून रोजी

Next Post
विधानभवन002 1024x512 1

अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे १२ महत्त्वाचे कायदे मंजूर…पुढील अधिवेशन ३० जून रोजी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011