मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इझमायट्रिप या भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या ऑनलाइन प्रवास तंत्रज्ञान व्यासपीठाला १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरू असणा-या ट्रॅव्हल उत्सव सेलच्या शुभारंभाची घोषणा करताना आनंद होत आहे. सेल इझमायट्रिपची अधिकृत वेबसाइट व अॅपवर सुरू होईल. या सेलमध्ये आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान तिकिटे, हॉटेल्स, कॅब्स, रेल्वे, बसेस, क्रूझेस व हॉलिडे पॅकेजेसवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येतील.
ग्राहक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांच्या बुकिंगवर अनुक्रमे जवळपास १४ टक्के व १० टक्के सूटचा लाभ घेऊ शकतात. हॉटेल बुकिंग्जसाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हॉटेल्स बुकिंगवर अनुक्रमे जवळपास ४० टक्के व २६ टक्के सूटचा लाभ घेऊ शकतात. कंपनी कॅब्सवर जवळपास १४ टक्के सूट, बसेसवर जवळपास २५ टक्के सूट, रेल्वे तिकिट बुकिंग्जवर जवळपास १० टक्के सूट देत सवलतीचे दर देखील देत आहे. शेवटचे म्हणजे इझमायट्रिप ग्राहकांना प्रति व्यक्ती ७,९०० रूपयांपासून सुरू होणारे हॉलिडे पॅकेजेस आणि प्रति व्यक्ती २६,५०० रूपयांपासून सुरू होणारे क्रूझ पॅकेजेस देत आनंदित करते.
कूपन कोड इएमटीउत्सवचा (EMTUTSAV) वापर करत या ऑफर्सचा लाभ घेता येऊ शकतो. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड्स, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड्स आणि स्टॅण्डर्ड चार्टर्ड क्रेडिट कार्ड्स व डेबिट कार्डसचा वापर करणाऱ्या ग्राहकांना ६ ते ९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अतिरिक्त सूटचा लाभ घेता येऊ शकतो. कोटक बँक क्रेडिट व डेबिट कार्डधारक देखील १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान त्यांच्या कार्डसचा वापर करत बोनस सूटचा लाभ घेऊ शकतात.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक श्री. रिकांत पिट्टी म्हणाले, ‘’इझमायट्रिपमध्ये आम्ही नेहमीच प्रत्येकाचा पसंतीचा ट्रॅव्हल सोबती असण्याला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक घराघरामध्ये सण उत्साहात साजरे केले जातात, ज्यामुळे यंदा प्रत्येकाला त्यांच्या प्रियजनांकडे जाण्याची संधी देण्याची आणि उत्सवाचा उत्साह पसरवण्याची आमची इच्छा आहे. ट्रॅव्हल उत्सव सेलसह आम्ही आमच्या ग्राहकांना मोठ्या सवलतींच्या माध्यमातून किफायतशीर प्रवास सुविधेचा लाभ घेण्याची संधी देत आहोत. आम्ही ग्राहकांशी संलग्न होण्यासोबत त्यांना लाभ देण्याकरिता अधिक विशेष डील्स व ऑफर्स सादर करण्यास उत्सुक आहोत.’’
मलेशिया एअरलाइन्स, लुफ्थांसा अॅण्ड स्विस एअरलाइन्स, एअरइंडिया, विस्तारा, कॅथेपॅसिफिक, व्हर्जिन अटलांटिक, कुवैत एअरवेज, व्हिएतनाम एअरलाइन्स, ब्रिटीश एअरवेज, स्पाइसजेट, एअर एशिया, ओमन एअर व एतिहाद एअरवेज अशा खास विमानसेवा भागीदारांसह विमान तिकिटे बुक केल्यावर, तसेच फॉर्च्युन हॉटेल्स, लेमन ट्री हॉटेल्स, वेलकम हेरिटेज, स्टर्लिंग हॉटेल्स, प्राइड हॉटेल्स, लॉर्ड्स हॉटेल्स अॅण्ड रिसॉर्टस, द क्लार्क्स हॉटेल्स अॅण्ड रिसॉर्ट, रोयाल ऑर्चिड हॉटेल्स, स्प्री हॉटेल्स, जस्ट हॉटेल्स, ली रॉय हॉटेल्स, सुबा हॉटेल्स, गोल्ड फिंच हॉटेल्सव सीजीएच अर्थ हॉटेल्स अशा हॉटेल भागीदारांसह निवास बुकिंग्जवर ग्राहक इझमायट्रिपकडील आकर्षक डिल्सचा लाभ घेऊ शकतात. याव्यतिरिक्त कार्स२४, कल्याण, मेडीबडी, पिझ्झाहट, डॉ. मोअरपेन, बग, आयमायआय यासारख्या ब्रॅण्ड भागीदारांकडून आकर्षक ब्रॅण्ड ऑफर्सचा लाभ घेता येऊ शकतो.
Easemytrip Travel Festival Sell Bumper Offers