मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इझमायट्रिपडॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाला समर हॉलिडे सीझनसाठी पर्यटकांकरिता विशेषरित्या डिझाइन केलेल्या ऑफर्सच्या मार्की बकेट ईजी समर सेलच्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. प्रवास विक्री व सूटची ही भव्य ऑफर ३० एप्रिल २०२३ पर्यंत आहे. ग्राहक व पर्यटक इझमायट्रिप वेबसाइट व अॅपवरील विक्रीच्या निर्धारित कालावधीदरम्यान बुक केलेले फ्लाइट्स, हॉटेल्स, बसेस, कॅब्स, क्रूझेस व हॉलिडे पॅकेजेसवर आकर्षक सूटसह अनेक ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात.
ईजी समर सेलमध्ये देशांतर्गत फ्लाइट्सवर १४ टक्केपर्यंत सूट, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर २५ टक्केपर्यंत सूट, हॉटेल्सवर ६० टक्केपर्यंत सूट, बस बुकिंग्जवर १,००० रूपयांपर्यंत सूट आणि आणि कॅब बुकिंग्जवर २,००० रूपयांपर्यंतची सूट आदी सवलतींचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.
ग्राहक इझमायट्रिपच्या अत्यंत विश्वसनीय हॉलिडे पॅकेजेसमधून देखील निवड करू शकतात, जेथे किंमती फक्त १५,९९९ रूपयांपासून सुरू होतात. समुद्रक्रिनारे व समुद्र सफारीचा आवड असलेल्यांसाठी क्रूझ पॅकेजेस ५३,९९९ रूपयांपासून उपलब्ध आहेत.
या सूटचा आनंद घेण्यासाठी वापरकर्त्यांनी त्यांच्या पसंतीच्या गंतव्यासाठी फ्लाइट, हॉटेल, बस, कॅब, क्रूझ किंवा हॉलिडे बुक करण्याची आणि कूपन कोड: ईएमटीसमर (EMTSUMMER)चा वापर करत पेमेंट करणे गरजेचे आहे. तसेच बुकिंग्जसाठी आरबीएल बँक क्रेडिट कार्ड व एयू क्रेडिट कार्डचा वापर करणारे ग्राहक २५ ते २७ एप्रिल २०२३ पर्यंत अतिरिक्त सूटसाठी पात्र असतील.
सेल्सच्या या सीझनमध्ये अधिक उत्साहाची भर म्हणजे सेल कालावधीदरम्यान करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहाराला पॅन्टालून्स, जेबीएल, नाशर माइल्स व आयजीपी यांसारख्या ब्रॅण्ड सहयोगींच्या उत्साही समूहाकडून गिफ्ट वाऊचर्स मिळण्याची संधी मिळेल. इझमायट्रिपच्या ब्रॅण्ड सहयोगींकडून या विशेष वाऊचर्सकरिता पात्र ठरण्यासाठी ग्राहकांना फक्त इझमायट्रिपचे ऑफिशियल ट्विटर व इन्स्टाग्राम हँडलला फॉलो करण्याची आणि ईजी समर सेलमध्ये सहभाग घेण्याची गरज आहे.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, “कडाक्याच्या ऊनामुळे भारतीयांच्या प्रवास उत्साहात अडथळा येता कामा नये. इझमायट्रिपमध्ये आम्हाला माहित आहे की पर्यटन म्हणजे गंतव्याचा इतिहास, संस्कृती व परंपरा यांबाबत माहिती करून घेणे आणि आमची प्रत्येक भारतीयाने या उन्हाळ्यामध्ये देशाच्या नवीन भागाचा आनंद घ्यावा अशी इच्छा आहे. हे शक्य करण्यासाठी आम्ही तुमच्या प्रवास गरजांच्या प्रत्येक पैलूवर व्यापक सूट देत आहोत. आम्ही इझमायट्रिपवरील स्पेशल ऑफर्स व सूटचा वापर करत अधिकाधिक ग्राहक आमच्यासह त्यांची तिकिटे बुक करतील अशी आशा करतो.’’