दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर व परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून रविवारी रात्री १० च्या सुमारास दोन धक्के बसले आहेत. मंगळवार १६ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास तीन शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी रात्री एक तर रविवार २१ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास दोन धक्के बसले आहे. प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर तहसीलदार पंकज पवार यांनी याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास माहिती दिली असून नागरिकांनी घाबरून जावू नये मात्र काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.