मुंबई – बरेचदा आपण सकाळी उठलो की थकवा जाणवतो. रात्री चांगली झोप लागली असेल तरीही हा थकवा जाणवला की आपल्याला आश्चर्य वाटतं. मात्र शारीरिकरित्या थकवा जाणवते, संपूर्ण दिवस अंग दुखणे, विकनेस आणि पिवळी पडलेली त्वचा हे सारे व्हिटॅमीन बी१२ची कमतरता असल्याचे दर्शविणारे आहे. ही उणीव महिलांमध्ये घातक समस्यांचे कारण ठरू शकते. तर आपण जाणून घेऊया आवश्यक व्हिटॅमीनच्या बाबतीत…
काय आहे व्हिटॅमीन बी१२
व्हिटॅमीन बी12 ला कोबालीन सुद्धा म्हटले जाते. हे एक पाण्यात मिसळणारे जीवनसत्व आहे. आपल्या लाल रक्तपेशी आणि डीएनएच्या निर्मितीमध्ये तसेच मज्जासंस्थेच्या योग्य कार्यामध्ये हे व्हिटॅमीन महत्त्वाची भूमिका बजावते. लाल रक्तपेशी तुमच्या फुप्फुसातून शरीराला ऑक्सिजन पुरवतात. याशिवाय व्हिटॅमीन बी१२ प्रथिने मेटाबोलाईज करण्यास मदत करते. ते स्नायूंच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे ठरते.
व्हिटॅमीन बी१२ च्या उणीवांची लक्षणे
श्वास भरणे
बेशुद्धी
डोकेदुखी
त्वचा पिवळी पडणे
धाप लागणे
भूक न लागणे
वजन घटणे
असे मिळेल व्हिटॅमीन बी १२
दूध, पनीर, दही हे पदार्थ प्रथिने आणि व्हिटॅमीनचे उत्तम स्रोत आहे. ज्यात व्हिटॅमीन बी12 सुद्धा सामील आहे. एक कप दुधात ४६ टक्के, व्हिटॅमीन बी१२ असते. चीजही व्हिटामीन बी12चे एक समृद्ध स्रोत आहे. स्वीस चीजच्या एका मोठ्या स्लाईसमध्ये (२२ ग्राम) जवळपास २८ टक्के बी१२ असते.
अंडी
अंड्यांमध्ये व्हिटॅमीन बी१२चे प्रमाण जास्त असते. दोन अंड्यांमध्ये ११ टक्के बी१२ मिळू शकते.
ट्राईट मासोळी
रेनबो ट्राऊट मासोळीला आरोग्यवर्धक मासोळ्यांपैकी एक मानले जाते. गोड पाण्यातील ही मासोळी प्रोटीन आणि व्हिटामीनचा मोठा स्रोत आहे.
मशरूम
मशरुममध्ये मोठ्या प्रमाणात बी१२ आहे. हे नैसर्गिक व्हिटॅमीन इतर खनिजांसह जर्मेनियम, नियासीन, पोटॅशीयम आणि फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहे.