इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय कसोटी संघाने इंग्लंडमध्ये शुबमन गिल याच्या नेतृत्वात दुसर्या कसोटी सामन्यात ३३६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचे आव्हान होते. पण, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांच्या जोडीने इंग्लंडला ६८.१ ओव्हरमध्ये २७१ रन्सवर थांबवत विजय मिळवला. भारताने यासह ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी करत लीड्समधील पहिल्या पराभवाची परतफेड केली.
या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत भारताला फलंदाजी दिली. त्यानंतर भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या ऐतिहासिक द्विशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ५८७ धावा केल्या. या सामन्यात शुबमनने २६९, यशस्वी जैस्वालने ८७ तर रवींद्र जडेजा याने ८९ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने ४२ आणि करुण नायर याने ३१ धावा केल्या. या फलंदाच्या एकुण कामगिरीतून भारताने १५१ षटकांमध्ये सर्वबाद ५८७ धावा केल्या.
त्यानंतर इंग्लडचा संघाची फलंदाजी सुरु झाली. त्यात गोलंदाजी करतांना मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या दोघांनीच मोठी कामगिरीक केली. सिराजने ६ आणि आकाशने ४ विकेट्स घेत इंग्लंडला ८९ ओव्हरमध्ये ४०७ रन्सवर ऑलआऊट केलं. त्यामुळे भारताला १८० धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर शुबमनने दुसऱ्या डावातही शुबमनने १६१ धावा केल्या. तर केएल राहुल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने अर्धशतकी खेळी करत निर्णायक योगदान दिल. केएल राहुल ५५, ऋषभ पंत ६५ आणि रवींद्र जडेजा याने नाबाद ६९ धावा केल्या. भारताने यासह दुसरा डाव हा ८३ षटकांत ६ बाद ४२७ धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला चौथ्या दिवशी ६०८ धावांचं आव्हान मिळाले.
चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७२ धावांवर ३ खेळाडू इंग्लडचे बाद झाले. त्यामुळे भारताला पाचव्या आणि अंतिम दिवशी ७ विकेट्सची गरज होती.
पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. एकट्या आकाश दीप याने इंग्लंडच्या ६ फलंदाजांना बाद केले. तर मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत इंग्लंडला ऑलआऊट करत ऐतिहासिक विजय मिळवला.