इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संघटीत कामगारांना कामगार संघटनांच्या दबावामुळे फायदे मिळतात, असंघटीत कामगारांना मात्र फारसा लाभ होत नाही, त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने दि. 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम पोर्टल सुरू केले. ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत सुमारे 20 कोटी नोंदणी झाली आहेत.
बहुतेक नोंदणी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंडमध्ये आहेत. सर्व नोंदणीकृत कामगारांना लाभ मिळण्यासाठी ई-श्रम कार्ड दिले जाईल. सर्व वर्गातील कामगार आधार क्रमांक आणि बँक तपशीलांच्या मदतीने स्वतःची नोंदणी करू शकतात.
पोर्टलवर यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या कामगारांना ई-श्रम कार्ड दिले जाईल. 12 अंकी UAN क्रमांक कार्डवर असेल. ई-श्रम पोर्टलच्या सदस्यांना यापुढे इतर कोणत्याही सरकारी सामाजिक कल्याण कार्यक्रमासाठी नोंदणी करावी लागणार नाही.
UAN हा १२-अंकी क्रमांक आहे जो पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर प्रत्येक असंघटित कामगाराला अनन्यपणे नियुक्त केला जातो. एकदा दिले तर ते कायमचे असेल आणि बदलणार नाही.
आवश्यक कागदपत्रे अशी
– आधार क्रमांक हवा, तसेच आधार एका सक्रिय मोबाइल क्रमांकाशी जोडलेला आहे
– बँक खाते तपशील
– वय 16-59 दरम्यान असावे
ऑनलाइन नोंदणी अशी करा
https://eshram.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा,
नोंदणीसाठी लिंक पृष्ठाच्या बाजूला असेल,
‘ई-श्रम वर नोंदणी’ वर क्लिक करा,
आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका,
‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा,
OTP एंटर करा, ई-श्रमसाठी नोंदणी फॉर्म उघडेल,
वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक तपशील प्रविष्ट करा,
आता नोंदणी पूर्ण झाली आहे.