शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘लिटिल ग्रेसी’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली….परवान्याची गरज नाही

by India Darpan
मार्च 20, 2025 | 7:17 pm
in संमिश्र वार्ता
0
Little Gracy e1742478382506

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असलेल्या झेलिओ ई मोबिलिटीने त्यांचे नवीनतम मॉडेल, लिटिल ग्रेसी, या कमी वेगाच्या, नॉन-आरटीओ इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले आहे. ही इ स्कूटर विशेषतः १०-१८ वयोगटातील तरुण रायडर्ससाठी तयार करण्यात आली आहे. या नवीन लॉन्चने कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एक उल्लेखनीय भर घातली आहे आणि त्यात सुरक्षितता आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून तरुण लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले आहे. लिटिल ग्रेसीला ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसल्यामुळे, ही स्कूटर एक विश्वासार्ह, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर वाहतुकीचा मार्ग शोधणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी एक आदर्श पर्याय आहे.

लिटिल ग्रेसी तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असून या इ स्कूटरची किंमत ४९,५०० रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ४८व्ही/३२एएच लीड अ‍ॅसिड बॅटरीची किंमत ४९,५०० रुपये असून ती ७-८ तासांच्या चार्जिंग वेळेसह ५५-६० कि.मी. ची रेंज देते. ६०व्ही/३२एएच लीड अ‍ॅसिड बॅटरीची किंमत ५२,००० रुपये असून ७-९ तासांच्या चार्जिंग वेळेसह ७० कि.मी. ची रेंज देते. तर ६०व्ही/३०एएच लीथियम-आयन बॅटरीची किंमत ५८,००० रुपये असून ८-९ तासांच्या चार्जिंग वेळेसह ७०-७५ कि.मी. ची रेंज देते.

झेलिओ ई मोबिलिटी लिमिटेडचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल आर्य म्हणाले, “लिटिल ग्रेसीच्या लाँचिंगसह, आम्ही असे उत्पादन सादर करण्यास उत्तेजित झालो आहोत, जे केवळ शैलीदार आणि क्रियात्मक नाही तर तरुण रायडर्ससाठी टिकाऊ वाहतूक देखील सुलभ करते. आमचे ध्येय हे, नेहमीच भारतातील दैनंदिन जीवनाचा एक भाग, इलेक्ट्रिक मोबिलिटी बनवणे हे राहिले आहे आणि लिटिल ग्रेसी ही, आम्हाला त्याकडे एक पाऊल जवळ घेऊन जाते. ही एक पर्यावरणपूरक, परवडणारी आणि परवान्याची गरज नसलेली स्कूटर आहे, जी आमच्या तरुण रायडर्सच्या विशिष्ट गरजा पूर्ण करते, त्याच वेळी नावीन्यपूर्णता आणि शाश्वततेसाठी आमची वचनबद्धता बळकट करते.”

प्रत्येक मॉडेल हे ४८/६०व्ही बीएलडीसी मोटरने सुसज्ज असून त्याचे वजन ८० किलो आहे, आणि त्याची लोडिंग क्षमता ८० किलो आहे. २५ कि.मी./तास कमाल वेग आणि प्रति चार्ज फक्त १.५ युनिट वीजेच्या वापरासह, लिटिल ग्रेसी ही,कमी अंतराच्या प्रवासासाठी एक कार्यक्षम आणि किफायतशीर असलेला उपाय आहे. या स्कूटरमध्ये डिजिटल मीटर, यूएसबी पोर्ट, चावीविरहित ड्राइव्ह, अँटी-थेफ्ट अलार्मसह सेंटर लॉक, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच आणि ऑटो-रिपेअर स्विच अशा आधुनिक सुविधा आहेत. यामध्ये हायड्रॉलिक सस्पेंशन, पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक्स देखील समाविष्ट आहेत आणि ते गुलाबी, तपकिरी/क्रीम, पांढरा/निळा आणि पिवळा/हिरवा या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

लिटिल ग्रेसीमध्ये मोटर, कंट्रोलर आणि फ्रेमवर दोन वर्षांची वॉरंटी देखील आहे, ज्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक क्रांतीचा अंगीकार करताना मनःशांती मिळते.
तिच्या स्थापनेपासून, झेलिओ ई मोबिलिटी भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेत लवकरच आघाडीवर आली आहे. २,००,००० हून अधिक समाधानी ग्राहक आणि देशभरात ४०० पेक्षा अधिक डीलरशिपच्या नेटवर्कसह, हा ब्रँड वेगाने आपला विस्तार करत आहे. २०२५ च्या अखेरीस १००० पेक्षा अधिक डीलरशिप करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, जे देशभरातील ग्राहकांना पर्यावरणपूरक आणि परवडणाऱ्या मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या तिच्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी करते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीचीही शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

Next Post

या क्षेत्रातील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना…उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून विधानसभेत विधेयक सादर

Next Post
विधानभवन002 1024x512 1

या क्षेत्रातील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना…उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून विधानसभेत विधेयक सादर

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011