विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना काळात डॉक्टरांकडून घरबसल्या मोफत सल्ला घेण्यासाठी शासनातर्फे ‘ई-संजीवनी ओपीडी’ ही ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.
ई-संजीवनी ॲपद्वारे आता सोमवार ते रविवार सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी १.४५ ते सायंकाळी ५ या वेळेते डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. रविवार आणि सुटीच्या दिवशीदेखील ही सेवा सुरू राहणार आहे. सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांना एसएमएसद्वारे ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते. ते दाखवून रुग्ण नजिकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या ॲप्लिकेशनमध्ये करण्यात आली आहे. राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण या सुविधेचा लाभ घेत आहेत. ही सेवा अत्यंत उपयुक्त असल्याने अधिकाधिक नागरिकांनी ‘ई-संजीवनी ओपीडी’ ॲप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केले आहे.
हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=in.hied.esanjeevaniopd