नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुद्रांक व नोंदणी विभाग, नाशिक जिल्हा व नरेडको नाशिक यांच्या एकत्रित पुढाकाराने शुक्रवारी शिल्पा इस्टेट यांच्या शिल्पा आनंदवन या गृहप्रकल्पात बुकिंग होऊन ऑनलाईन ई-रजिस्ट्रेशन करण्यात आले. शिल्पा इस्टेट ऑफिस, होलाराम कॉलनी, नाशिक या कार्यालयात नोंदणीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी, कैलास दवंगे व तांत्रिक विभाग अधिकारी देविदास कोल्हे तसेच, ई-रजिस्ट्रेशन नोंदणीवेळी दस्त नोंदणी करणारे शुभम सतीश चौधरी, वैभवी शुभम चौधरी उपस्थित होते. दस्त नोंदणीकरिता मुद्रांक कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून अगदी शासकीय सुट्टी असलेल्या दिवशी दस्त नोंदणी होणार आहे. राज्य शासनाच्या मुद्रांक व नोंदणी विभागाच्या वतीने ऑनलाईन दस्त नोंदणीकरिता विशेष पोर्टल बनविण्यात आलेले आहे. अतिशय सुटसुटीत व सोप्या प्रणाली द्वारे नोंदणी पार पडली. यावेळी मनोगत व्यक्त करतांना गृह खरेदी घेणारे शुभम सतीश चौधरी व वैभवी शुभम चौधरी यांनी राज्य शासनाची ई-रजिस्टेशन प्रणाली सुखद अनुभव देणारी असल्याचे अधोरेखित केले. यासर्व प्रणालीत १० मिनिटाच्या आत दस्त नोंदणी होत आहे, याचा आनंद अवर्णनीय असा आहे. सर्वानी या योजनेचा ध्यास घ्यावा असे सांगितले.
याप्रसंगी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे, तांत्रिक विभाग अधिकारी देविदास कोल्हे, शुभम सतीश चौधरी, वैभवी शुभम चौधरी ,नरेडको नाशिकचे सुनील गंवादे, जयेश ठक्कर, शंतनू देशपांडे, भाविक ठक्कर, राजेंद्र बागड, पुरुषोत्तम देशपांडे, अश्विन आव्हाड, परेश शाह, हर्ष केडिया, लौकिक तातेड, युनिअन बँक अधिकारी, भूषण राणे, पार्कसाईड नाशिकचे प्रतिनिधी रोहित शाह, पिरामल हौसिंग फायनान्सचे मनॊज भारती, मयूर आवारे, योगिता सानप, विजय सुराणा, सुशील देशपांडे आदी उपस्थित होते.