मुंबई – राज्यात कडक लॉकडाऊन सुरू होताच राज्य सरकारने प्रवासासाठी पुन्हा ई पास बंधनकारक केला आहे. हा पास ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधितांना मिळू शकणार आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही राज्य सरकारने हा ई पास लागू केला होता. आता ब्रेक दि चेन अंतर्गत राज्य सरकारने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे जिल्हांतर्गत, परजिल्ह्यात आणि अन्य राज्यात जाण्यासाठी हा ई पास आवश्यक असणार आहे.
ई पास असा मिळू शकेल
– महाराष्ट्र पोलिसांनी https://covid19.mhpolice.in/ ही वेबसाईट पुन्हा सक्रीय केली आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर जावे लागेल.
– या वेबसाईटवर apply for pass here हा पर्याय आहे. त्यावर क्लिक करावे
– ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे तो सर्वप्रथम निवडावा
– प्रवासासाठी आवश्यक ती कागदपत्रे बंधनकारक आहेत. ती जोडावीत.
– प्रवास का करायचा आहे, त्याचे कारण द्या लागेल.
– अर्ज सबमिट केल्यानंतर तातडीने एक टोकन आयडी जनरेट होईल. तो तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे.
– टोकन आयडीद्वारेच तुम्हाला तुमच्या अर्जाचे खरे स्टेटस समजणार आहे.
– पोलिसांनी खात्री केल्यानंतर तुम्हाला ई पास मिळेल.
– टोकन आयडीच्या माध्यमातून तुम्हाला ई पास डाऊनलोड करता येईल.
ई पासमध्ये नक्की काय असेल
– ई पासमध्ये तुमचे संपूर्ण नाव, तुम्ही अर्ज केव्हा केला, तुमच्या वाहनाचा क्रमांक, ई पास क्रमांक, पासच्या वैधतेचा कालावधी, क्युआर कोड, तुम्ही कुठे जाणार आहात, हे सर्व नमूद असेल. हाच ई पास तुम्हाला पोलिसांनी विचारले असता दाखवावा लागेल. त्यामुळे हा ई पास सोबत बाळगावा लागेल.