गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘ई-गव्हर्नन्स’ प्रादेशिक परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या मुंबईत उद्घाटन

by Gautam Sancheti
जानेवारी 22, 2023 | 7:22 pm
in संमिश्र वार्ता
0
online

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, दि. २३ व २४ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे ‘ई-गव्हर्नन्स’ या विषयावर दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे आयोजन केले आहे. उद्या सोमवार, दि. २३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, या या परिषदेचे उद्घाटन होईल. देशभरातील ५०० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेस प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने उपस्थित राहतील.

परिषदेत २० राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ५०० प्रतिनिधींचा सहभाग
परिषदेत २० राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेत संस्थांचे डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवराच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. तसेच ई-सेवा, डिजिटल मंच आणि ई-प्रशासन मॉडेल्स सुधारण्याच्या मार्गांवर प्रतिनिधी करणार चर्चा करणार आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रादेशिक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी संबोधित करणार आहेत. राज्य सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिव, (सामान्य प्रशासन विभाग) सुजाता सौनिक आणि डीएआरपीजीचे सचिव व्ही. श्रीनिवास हे देखील उद्घाटन सत्रात संबोधित करतील. समारोप सत्रात केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदेला संबोधित करतील. अतिरिक्त सचिव अमर नाथ आणि सचिव व्ही. श्रीनिवास देखील या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमांवर एक माहितीपट
महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमांवर एक माहितीपटही यावेळी दाखविला जाईल. तसेच परिषदेच्या समारोप सत्रात, विशेष मोहीम २.० (विशेष आवृत्ती) वरील एमजीएमजी (Minimum Government, Maximum Governance) आणि जीजीडब्ल्यू २०२२ पुस्तिकेचे तसेच ई-जर्नलचे प्रकाशनही होईल.
उद्घाटन सत्रादरम्यान, खालील गोष्टी प्रदर्शित केल्या जातील
(i) महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयीन प्रक्रियेच्या नियमावलीचे संक्षिप्त सादरीकरण (Manual of Office Procedure)
(ii) प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) च्या वर्ष अखेर आढाव्यावर आधारित चित्रपट
(iii) ई प्रशासन उपक्रमांवर आधारित ई – जर्नल एम जी एम जी प्रकाशित केले जाईल.

सुशासन परिसंवाद स्टार्टअपचे पहिले सत्र
‘सुशासन परिसंवाद स्टार्टअप’ या विषयावर आधारित पहिल्या सत्राचे अध्यक्षपद, कर्नाटक सरकारच्या, कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे मुख्य सचिव, डॉ. श्रीवत्स कृष्णा भूषवतील. पहिल्या सत्रात चार स्टार्ट अप कंपन्या सादरीकरण करतील. महाराष्ट्र शासनाचे सर्व सनदी अधिकारी या सत्रात उपस्थित राहतील. भारतीय लोक प्रशासन संस्था, आयआयपीएचे महासंचालक डॉ. एस.एन. त्रिपाठी ‘ई-प्रशासन पुरस्कार उपक्रम’ या विषयावरील दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष असतील. दुपारच्या सत्रांमध्ये (सत्र – तीन) प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे अतिरिक्त सचिव, अमर नाथ, यांच्या अध्यक्षतेखाली ‘ई-प्रशासन पुरस्कार उपक्रम’ या विषयावर सादरीकरण होईल. पुणे येथील यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम, हे ‘महाराष्ट्र सरकारच्या सर्वोत्तम पद्धती’ या विषयावरील चौथ्या सत्राच्या अध्यक्षपदी असतील.

डिजिटल संस्था – डिजिटल सचिवालये विषयावर सादरीकरण
दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पाचव्या सत्रात महाराष्ट्राचे भारतीय लोक प्रशासन संस्थेचे निवृत्त आय.ए.एस. अधिकारी स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील ‘डिजिटल संस्था – डिजिटल सचिवालये’ या विषयावर सादरीकरण होईल. सहाव्या सत्रात ACT चे संदीप सिंघल आणि पपिलफर्स्टचे सह-संस्थापक संजय विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ‘ई-गव्हर्नन्समधील स्टार्ट-अप्स’ या विषयावर सादरीकरण केले जाईल.

राष्ट्रीय इ-प्रशासन सेवा प्रदान मूल्यमापन ‘NeSDA 2021 – पुढील मार्ग’ आठवे सत्र
सहाव्या सत्रात राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग, NeGD/DIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग, यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यांमधील ई-सेवा वितरण’ या विषयावर सादरीकरण होईल. राष्ट्रीय स्मार्ट सरकार संस्था, ‘राष्ट्रीय इ-प्रशासन सेवा प्रदान मूल्यमापन NeSDA 2021 – पुढील मार्ग’ या विषयावरील एन आय एस जी चे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.आर.के. राव आठव्या सत्राचे अध्यक्ष असतील. ‘डेटा प्राणित तक्रारी’ या विषयावरील नवव्या सत्राचे अध्यक्षपद पुणे येथील यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग, NeGD/DIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग भूषवतील.

ही परिषद म्हणजे प्रशासकीय प्रशिक्षणातील सर्वोत्तम पद्धतींच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये अंतर्भूत असलेल्या नागरिक केंद्रित प्रशासन सुलभ करण्यासाठी क्षमता वृद्धी, ई-गव्हर्नन्सद्वारे सुधारित सार्वजनिक सेवा वितरण, पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिक- स्नेही प्रभावी प्रशासन यासंदर्भातले अनुभव सामायिक करण्यासाठी एक समान मंच तयार करण्याचा प्रयत्न असेल.

E Governance Conference in Mumbai CM Shinde

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा व्हिडिओ बघा; तुम्ही सुद्धा हादरुन जाल!

Next Post

मालेगावातील भाजपचा हा नेता ठाकरे गटात जाणार; आगामी निवडणुकीत अशी बदलणार समीकरणे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, गुरुवार, २८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 27, 2025
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 1024x682 1
राष्ट्रीय

दिल्लीत महाराष्ट्र सदनात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
Next Post
IMG 20230122 WA0017

मालेगावातील भाजपचा हा नेता ठाकरे गटात जाणार; आगामी निवडणुकीत अशी बदलणार समीकरणे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011