मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इलेक्ट्रिक कंपनी आयवूमी एनर्जीने पुण्यामध्ये एक नवा उत्पादन प्लांट तयार करण्यासाठी २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून विस्तार करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्पादने किफायतशीर किमतींमध्ये उपलब्ध करवून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्या संशोधन व विकास सुविधा वाढवण्यासाठी कंपनी महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे.
पुण्यामध्ये तयार केला जाणार असलेला उत्पादन प्लांट या कंपनीचा भारतातील चौथा प्लांट असणार आहे. संपूर्णपणे एकात्मिक इलेक्ट्रिक टू-व्हीलर प्लांट मार्च २०२३ पासून सुरु होईल. या प्लांटमुळे कंपनीत स्थानिक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील, याठिकाणी २,००० हुन जास्त लोकांना नोकऱ्या मिळतील. कंपनी करत असलेली ही गुंतवणूक त्यांची उत्पादन क्षमता ६०,००० हुन जास्त युनिट्सपर्यंत वाढवेल, त्यामुळे त्यांचे उत्पादन दरवर्षी १,८०,००० ते २,४०,००० युनिट्स इतके वाढेल. आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरपर्यंत २,००,००० हुन जास्त युनिट्स रोल आउट करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही कंपनी आगेकूच करत आहे.
आयवूमीचे सीईओ आणि सह-संस्थापक श्री अश्विन भंडारी यांनी सांगितले, “इलेक्ट्रिक गाड्यांसाठी सरकारच्या भविष्यवेधी उद्दिष्टांना अनुसरून आम्ही ग्राहकांसाठी किफायतशीर उत्पादने बनवण्यासाठी नव्या संशोधन व विकास सुविधा आणि उत्पादन युनिट्स सुरु करून तसेच भविष्यात या उद्योगक्षेत्रात निर्माण होतील अशा मागण्यांवर लक्ष केंद्रित करत ईव्ही इकोसिस्टिम तयार करण्याच्या दिशेने सातत्याने काम करत आहोत. आम्ही असे मानतो की, या उद्योगक्षेत्रात विकास आणि नावीन्यपूर्णतेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि याठिकाणी एक मानदंड निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्यामुळे या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत लक्षणीय विकास करण्यासाठी आम्ही संशोधन व विकास आणि व्यापार विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
आयवूमीचे एक संशोधन व विकास युनिट पुण्यामध्ये आधीपासून कार्यरत आहे. नोएडा, पुणे आणि अहमदनगरमध्ये त्यांच्या उत्पादन सुविधांमध्ये दर दिवशी ५०० इलेक्ट्रिक स्कुटर्स तयार करण्याची क्षमता आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या समर्थनार्थ, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या इन-हाऊस तयार करणाऱ्या अतिशय मोजक्या कंपन्यांपैकी एक आयवूमी आहे. ही कंपनी एका व्यापक उत्पादन विकास धोरणावर काम करत आहे, ज्यामध्ये भविष्यासाठी सज्ज काही उत्पादने बाजारपेठेत दाखल करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने काही महत्त्वाचे विकास केले आहेत, ज्यांच्यावर अद्याप काम सुरु आहे. रायडर्सना बॅक सपोर्टसाठी एक्सक्लुसिव्ह बी२बी ऍक्सेसरीज आणि इन्स्टॉल करायला अगदी सहजसोप्या मॉड्यूलसारखे काही ऍड-ऑन आहेत जे दुचाकी ग्राहकांना खूपच फायदेशीर ठरतील.
E Bike Company Pune 200 Crore Investment 2 Thousand Employment