विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून आगामी काही वर्षात कच्चा इंधनाचे साठे संपुष्टात आल्यावर यावर चालणारी वाहने बाद होण्याची शक्यता असून याची चाहूल लागली आहे. त्यामुळे आत्तापासूनच ‘ ई बाईक ‘ मागणी वाढू लागली आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहने आणणारी अग्रगण्य ई बाइक गो कंपनी लवकरच बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे. कंपनीची ही बाईक अधिकृतपणे २५ ऑगस्टला लाँच केली जाईल. तसेच स्कूटर पेट्रोलपेक्षा ५ पट अधिक परवडणार आहे.
सबसिडीसाठी देखील पात्र : भारतीय बाजारपेठेत सादर होणारे हे आतापर्यंतचे सर्वात मजबूत इलेक्ट्रिक वाहन असेल, असा कंपनीचा दावा आहे. सदर स्कूटरची डिझाईन पूर्णपणे भारतात तयार केली गेली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला आयसीएटीची मान्यता मिळाली आहे आणि ती फेम २ सबसिडी कार्यक्रमासाठी देखील पात्र आहे.
ग्राहकांच्या सर्व गरजा आणि उपयुक्ततेचा विचार : प्रारंभी कंपनी मर्यादित प्री-ऑर्डर घेणार : कंपनीचे म्हणणे आहे की, ई बाईक या नवीन वाहनाच्या निर्मितीपूर्वी बरेच संशोधन झाले आहे. हे वाहन आय टी तंत्रज्ञान द्वारे गोळा केलेल्या लाखो डेटा पॉईंट्सचा वापर आणि विश्लेषण करून तयार केले गेले आहे. तसेच ते ग्राहकांच्या सर्व गरजा आणि उपयुक्ततेच्याआधारावर तयार केले आहे.
सर्व सामान्यांना परवडणारे इलेक्ट्रिक वाहन : कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इरफान खान म्हणाले, आम्ही एक मजबूत इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यासाठी जवळपास तीन वर्षे वाट पाहिली आणि त्यानंतर आम्ही या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला असे परवडणारे इलेक्ट्रिक वाहन बनवायचे आहे, जे सर्व सामान्य लोकांकडून सहजपणे स्वीकारले जाऊ शकते.
कमी शुल्क आणि थोडा खर्च: कंपनीने नुकतेच जाहीर केले की, ते देशातील पाच शहरांमध्ये सुमारे ३ हजार सक्षम सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी काम करणार आहेत. ही चार्जिंग स्टेशन्स संबंधित शहरांमध्ये दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने दोन्ही चार्ज करू शकतील. सुलभ प्रवेशासाठी ही चार्जिंग स्टेशन इंटरनेटशी जोडली जातील. तसेच चार्जिंग स्टेशन वापरू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी फक्त QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे.
पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनापेक्षा पाचपट स्वस्त : बाइक गो कंपनी ग्राहकांना एक स्मार्टफोन देखील प्रदान करेल. त्यामुळे वापरकर्ते त्यांचे वाहन चार्ज करताना वापरलेले युनिट तपासू शकतील. यूपीआय, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा रोख यासारख्या विविध पेमेंट पद्धती या चार्जिंग स्टेशनवर उपलब्ध असतील. या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी सुमारे २०-५० पैसे प्रति किलोमीटर खर्च येईल. पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनापेक्षा हे पाचपट स्वस्त असेल.