मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात कांदा उत्पादक प्रचंड अडचणीत आले आहेत. कांद्याचे दर कोसळल्याने कांद्याचा उत्पादन खर्चही मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच शेतकरी सध्या संतप्त झाले आहेत. कांद्याचे लिलाव बंद पाडण्यासह ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलने सुरू आहेत. याचे पडसाद विधिमंडळातही उमटले आहेत. अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरू आहे. विरोधकांनी कांद्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
फडणवीस म्हणाले की, नाफेडच्या माध्यमातून १० नवीन खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. आतापर्यंत १८,७४३ क्विंटल कांदा खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय झाला आहे, त्यासाठीच समिती गठीत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1631208432651968515?s=20
DYCM Devendra Fadnavis on Onion Farmers Issue