नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे मीच पाठवला होता, असा स्पष्ट खुलासा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पदभार घेतल्यानंतर ते प्रथमच नागपूर दौऱ्यावर आले होते. विशेष म्हणजे, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद का स्विकारले याचा खुलासा आता खुद्द त्यांनीच केला आहे. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्रीपदाबाबत
या सरकारमध्ये सामिल व्हायचं नाही हे मी ठरवलं होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इच्छा व्यक्त केली की मी सरकारमध्ये सामिल व्हावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर मी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचा निर्णय घेतला. हे पद घेतलं याचा मला कुठलाही कमीपणा वाटत नाही.”, असे त्यांनी स्पष्ट केले.
बघा त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1544281232120631296?s=20&t=l8v1JT6D8fpPduGuIacxJw