नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते.
मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, असे वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. नारायण यांच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित केला. सीमाप्रश्नाला चुकीचे वळण देण्याचे आणि सीमावासीयांच्या भावनेला ठेच पोहचवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे. कर्नाटक सरकारची ही माहिती केंद्र सरकार पर्यंत पोहचवावी, अशी मागणी पवारांनी केली.
त्यावर उत्तर देताना फडणवीस पुढे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत. सभागृह याचा निषेध करित आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही, असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1608001317393375235?s=20&t=SQhi0tOiQHxkpJq8rlN0JA
DYCM Devendra Fadanvis on Mumbai Claim
Maharashtra Assembly Winter Session Nagpur
Karnataka Minister