नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप आणि शिंदे गटाच्या नेतृत्वातील राज्य सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होणार याबाबत विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. या विस्तारावरुन शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याचेही बोलले जाते. मात्र, अंतर्गत वादामुळेच हा विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. त्यातच आता यासंदर्भात भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होणार सासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा माध्यमांकडे काहीच बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा केली जाते.
फडणवीस यांच्या या उत्तरानेच मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याची चर्चा जोर धरत आहे. भाजप आणि शिंदे गटात एकमत होत नसल्यानेच आता हा विस्तार होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर तो होईल, अशी अटकळही बांधली जात आहे.
बघा, फडणवीस काय म्हणाले
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1585176066964213760?s=20&t=cTwa5yFXCtiGANKSbxo3AA
DYCM Devendra Fadanvis on Cabinet Expansion