पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही दोन विरोधी किंवा वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते एकत्र येतात, तेव्हा त्याची लगेच वेगळीच चर्चा सुरू होते. त्यातच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरू असल्याने दोन मोठे ज्येष्ठ नेते एकत्र भेटले की दोन वेगवेगळ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्र भेटले की लगेच यांच्यात युती होणार किंवा एखादा नेता पक्षांतर करणार अशी चर्चा सुरू होते. सध्या अशोक चव्हाण यांच्या बाबतीतही असेच म्हटले जात आहे.
पुणे येथे माजी मुख्यमंत्री आणि मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे मंत्री राहिलेले अशोक चव्हाण आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात एकत्र भेट झाली. त्या संदर्भात सध्या उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. तसेच राजकीय समीकरणे व अंदाज देखील बांधला जात आहे. परंतु याबाबत खुद्द फडणवीस यांनी खुलासा केला आहे. फडणवीस माझी अशोक चव्हाण यांच्याशी भेट झालेली नाही. गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने मी पोहोचलो आणि अशोक चव्हाण निघाले होते, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. चव्हाण आणि फडणवीस यांची भेट आशिष कुलकर्णी यांच्या घरी झाल्याची तसेच त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, यावर फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.
तसेच मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? असा प्रश्न विचारल्यावर मात्र फडणवीस यांनी मौन बाळगले. त्याचप्रमाणे मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, पुण्याची लोकसभाही लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी केला. इतिकेच नव्हे तर या सर्व फक्त माध्यमातील चर्चा आहेत, असेही ते म्हणाले.
पुण्याचे दोन स्वतंत्र भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता असा सवाल करत जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू. राज्य सरकारसमोर आज तरी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1565660342813806592?s=20&t=yluir6NW0Ei_o9N5ksi_cQ
DYCM Devendra Fadanvis on Ashok Chavhan Meet
BJP Congress Politics