मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. फडणवीस यांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून बोलवणे आल्याने ते दिल्लीकडे निघाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठीच या हालचाली सुरू झाल्या आहेत.
फडणवीस हे आज मंत्रालयात होते. त्याचवेळी त्यांना दिल्लीतून भाजप श्रेष्ठींचा संदेश आला. त्यानंतर त्यांनी तातडीने दिल्लीकडे जाण्याची तयारी केली. आणि ते रवाना झाले आहेत. शिवसेनेतील अंतर्गत वाद आणि राजकीय सत्ता संघर्षासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या सोमवारी (८ ऑगस्ट) होणार आहे. न्यायालयातील सुनावणीकडे भाजप पक्षश्रेष्ठींकडे बारकाईने लक्ष होते. मंत्रिमंडळ विस्तारात कुठलेही विघ्न नको किंवा कायदेशीर अडचणी नको म्हणून भाजप पक्षश्रेष्ठींनी सावध भूमिका घेतली. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार तब्बल महिन्याभरापासून रखडला आहे. मात्र, आता त्यास वेग देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आजच्या सर्व नियोजित बैठका रद्द केल्या आहेत. त्यांना खुपच थकवा जाणवत आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून म्हणजेच गेल्या महिनाभरापासून त्यांनी स्वतःला खुपच बिझी ठेवले होते. विविध दौरे आणि कार्यक्रमांमुळे त्यांचे दिवसभराचे वेळापत्रक अतिशय व्यस्त होते. मात्र, आज त्यांना थकवा जाणवत आहे. त्यामुळे त्यांनी आराम करण्याचा निर्णय घेतला असून सर्व बैठका रद्द केल्या आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? ही नावे अंतिम https://t.co/gG9e63AXoz
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) August 4, 2022
DYCM Devendra Fadanvis Goes at Delhi